सार्वजनिक बांधकाम विभाग, सावंतवाडी

“सह्याद्रीच्या तळी शोभते हिरवे तळ कोकण, राष्ट्रदेवीचे निसर्गनिर्मित केवळ नंदनवन.” या कवी माधव यांच्या ओळी साक्षात जगणारा जिल्हा म्हणजेच सिंधुदुर्ग जिल्हा .एका बाजूला कोंकण प्रदेशातील अरबी समुद्रातील स्वच्छ व सुंदर समुद्रकिनारे आणि दुसरीकडे सह्याद्री पर्वताच्या डोंगररांगा, सिंधुदूर्ग व विजयदूर्ग असे ऐतिहासिक किल्ले आहेत. या जिल्ह्याची स्थापना 1 मे 1981 रोजी झाली, तो रत्नागिरी जिल्ह्यापासून वेगळा करण्यात आला.

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्यालय 'सिंधुदुर्गनगरी' असून, सिंधुदुर्ग जिल्हा हा ५,२०७ चौ.किमी. क्षेत्रामध्ये पसरलेला आहे.सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग कोकण अंतर्गत अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ सिंधुदूर्ग यांचे अधिनस्त कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडी हे कार्यालय कार्यरत आहे. सावंतवाडी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीपत्याखाली सार्वजनिक बांधकाम उपविभाग सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्ग, कुडाळ व मालवण हे उपविभाग कार्यरत आहे.

सार्वजनिक बांधकाम खात्याने निर्गमित व पथदर्शीत केलेल्या सेवा सौजन्यपूर्वक वागणुकीने उपलब्ध करून तसेच ईमारती, पूल व रस्ते यांची दर्जेदार कामे करून बांधकाम खात्याविषयी जनसामान्यात आपलेपणाची भावना तयार करण्यास आम्ही कटीबध्द आहोत.

आमचे कामाचे अधिकार क्षेत्र

Malvan Vengurla Sawantwadi Kudal Dodamarg

मान्यवर व्यक्ती

श्री. देवेंद्र फडणवीस
मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

श्री. एकनाथ शिंदे
मा. उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

श्री.अजित पवार
मा. उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

श्री. शिवेंद्रराजे भोसले
मा. मंत्री,
सार्वजनिक बांधकाम विभाग

श्री. इंद्रनील म. नाईक
मा. राज्यमंत्री,
सार्वजनिक बांधकाम विभाग

श्रीम. मनिषा पाटणकर-म्हैसकर
अतिरिक्त मुख्य सचिव,
सा. बां. विभाग मंत्रालय, मुंबई

श्री. एस. एस. साळुंखे
सचिव (रस्ते),
सा. बां. विभाग मंत्रालय, मुंबई

श्री. एस. डि. दशपुते
सचिव (बांधकामे),
सा. बां. विभाग मंत्रालय, मुंबई

श्री. एस. एन. राजभोज
मुख्य अभियंता,
सा. बां. प्रादेशिक विभाग, कोकण

श्री. मिलिंद कुलकर्णी
अधीक्षक अभियंता,
सा. बां. मंडळ, सिंधुदुर्ग

श्री. महेंद्र किणी
कार्यकारी अभियंता,
सा. बां. विभाग, सावंतवाडी

किल्ले राजकोट, ता. मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण