पर्यटनमंत्र्यांच्या हस्ते किरणपाणी-आरोंदा पुलाचे उद्घाटन

१६ मार्च २०१३ रोजी पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी गोव्याला महाराष्ट्राशी जोडणाऱ्या किरणपाणी-आरोंदा पुलाचे उद्घाटन केले.

महाराष्ट्र सरकारने १९९९ मध्ये या पुलाच्या बांधकामाला मान्यता दिली होती. २००६ मध्ये या प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली. पुलाची लांबी ३०८ मीटर असून ७.५ मीटर रुंदीचा दोन पदरी रस्ता आणि पुलाच्या दोन्ही बाजूंना १.२ मीटर लांबीचा पदपथ आहे.

महाराष्ट्र सरकारने २२ कोटी रुपये खर्चाचा हा पूल बांधला आहे.