किल्ले राजकोट, ता. मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी दलाचे आद्यस्थान म्हणजे मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ला होय. भुईकोट आणि डोंगराळ किल्याच्या बरोबरीने सागरी मार्गावरील परकीय शत्रूंची स्वारी परतून लावण्यासाठी जलदुर्गांची निर्मिती महत्वाची आहे हे ओळखून शिवाजी महाराजांनी सागरी किल्ले निर्माण केले. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज हे खर्या अर्थाने “भारतीय नौदलाचे जनक” आहेत. त्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्ले राजकोट येथे भारतीय बौदल दिनाचे औचित्य साधून दिनांक ०४ डिसेम्बर २०२३ रोजी भारतीय नौदलाने उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण माननीय पंतप्रधान यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्या नंतर या स्मारकाला देश विदेशातील लोकहो पर्यटकांनी भेट दिली. त्यामुळे महाराष्ट्राचा वैभवशाली इतिहास राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पटलावर अधोरेखित झाला व मालवणच्या पर्यटनाला अधिक चालना मिळाली.

परंतु दुदैवाने दिनांक २६ ऑगस्ट २०२४ रोजी या पुतळ्यास दुर्घटना घडली. त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम नागरिक आणि शिवभक्तांच्या मनावर शोककळा पसरली. छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड भारत देशाची अस्मितेचे प्रतिक असल्यामुळे जनभावनांचा प्रक्षोभ झाला. सदर दुर्घटनेबाबत माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २८ ऑगस्ट २०२४ रोजी बैठकीचे आयोजन करण्यात येऊन या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुनश्च नव्याने उभारण्याबाबत निर्णय घेण्यात आला. नवीन पुतळ्याचा कामाचा वाव, संकल्पना, कार्यपद्धती निश्चित करून शिफारसी करण्याकरिता समिती स्थापन करणे बाबत बैठकीत ठरले.

समितीच्या शिफारसीनुसार किल्ले राजकोट तालुका मालवण येथे पुतळा उभारण्याचे कामास महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रुपये ३१.७५ कोटी रकमेस मान्यता पादन करण्यात आली. त्यानंतर या कामासाठी निविदा प्रक्रिया राबवून मे.सुतार आर्ट क्रिएशन प्रा. लि. दिल्ली यांना दिनांक ११ ऑक्टोबर २०२४ रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आले. हे काम EPC तत्वावर प्रख्यात शिल्पकार श्री. राम सुतार यांच्या संस्थेमार्फत करण्यात आले. पुतळ्याच्या कामासंबंधीची महत्वपूर्ण वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत.

१. छत्रपती शिवाजी महाराजांचा युद्धासमयी बाजात म्हणजेच योद्धा भूमिकेत (warrior pose) असलेल्या तलवारधारी ६० फुट उंचीचा पुतळा उभारण्यात आला आहे. तलवारीसह पुतळ्याची उंची ८३ फुट इतकी आहे. तसेच पुतळ्याच्या चबुतऱ्याची उंची १० फुट इतकी आहे. जमीन पातळीपासून या पुतळ्याची उंची ९३ फुट इतकी आहे.

२. पुतळा उभारण्यासाठी C९०-३०० ग्रेडचे ब्राँझ धातूचा उपयोग करण्यात आला असून यामध्ये ८८% तांबे, ४% जस्त व ८% कथिल धातूचा समावेश आहे. पुतळ्यासाठी सरासरी ६ ते ८ मिलीमीटर जाडीचे कांस्य वापरण्यात आले आहे.

३. या कामासाठी DUPLEX स्टेनलेस स्टीलचे सपोर्ट फ्रेमवर्क, स्टेनलेस स्टील SS ३१६ दर्जाचे सळई असे गंजरोधक बांधकाम साहित्य वापरण्यात आले आहे.

४. चबुतऱ्यासाठी M ५० उच्च दर्जाचे कोन्क्रिट तसेच स्टेनलेस सळई SS ३१६ ग्रेडचे वापरण्यात आले आहे.

५. फियान, निसर्ग, तोक्ते यासारखी वादळे गेल्या काही वर्षात अधिकाधिक तीव्रतेची वारंवार उद्भवत आहेत. त्यानुसार सदर पुतळा सर्व वातावरणीय परिणामांच्या माऱ्यास योग्य प्रकारे तोंड देईल, या पद्धतीने संरचनात्मक संकल्पना करून पुतळ्याचे किमान आयुर्मान १०० वर्षे राहील अशा पद्धतीने पुतळा कंत्राटदार मे. राम सुतार आर्ट् क्रिएशन प्रा. लि. यांनी केमा केले आहे. तसेच पुढील १० वर्षे नियमित देखभाल आणि पर्यवेक्षण करण्याची जबाबदारी कंत्राटदारावर आहे.

६. मौजे मालवण येथील सर्व्हे क्रमांक ११९९, हिस्सा क्रमांक २, येथील बांधकाम विभागाच्या मालकीच्या ३३.६० गुंठे जागेवर पुतळ्याची नव्याने उभारणी करण्यात आली आहे.

७. मेसर्स राम सुतार आर्ट् क्रिएशन यांनी सादर केलेल्या पूर्णाकृती पुतळ्यास कला संचालनालय. मुंबई यांच्या मान्यता प्राप्त झाली आहे.

८. पुतळ्याच्या चबुतर्याच्या आराखड्यास मुख्य वास्तू शास्त्रज्ञ सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र राज्य यांच्याकडून मंजुरी प्राप्त आहे.

पुतळ्याचे संरचनात्मक संकल्पना कम्पुटर सोफ्टवेअर अन्वये तयार करण्यात आले सून साधारणतः ताशी २०० किलोमीटर वेगाच्या वाऱ्यांचा दबाव तसेच भूकंपप्रवण क्षेत्र ४ मुळे निर्माण होणारे दाब यांचा विचार करण्यात आला आहे. कंत्राटदाराच्या सल्लागाराकडून प्राप्त संकल्पने व आराखडे आय.आय.टी. मुंबई येथील Structural Expert प्रोफेसर श्री. आर एस जांगीड यांचे कडून तपासून प्रमाणित केल्यानंतरच पुतळा उभारण्यासाठी शिल्पकारामार्फत वापरण्यात आली आहेत.

पुतळा उभारणीसाठी आय. आय. टी. मुंबई यांच्या कडून मान्यताप्राप्त संकल्पना नुसार दुप्लेक्स स्टील चे फ्रेमवर्क अखंड वेल्डिंग द्वारे जोडकाम करून सांगाडा तयार करण्यात आला असून त्यावर पुतळ्याच्या ब्राँझ क्लाडिंग जोडण्यात आले आहे.

या पुतळा उभारणीसाठी अंदाजे ५५,००० किलो ब्राँझ धातू, ३०,००० किलो ड्यूप्लेक्स स्टील फ्रेमवर्क व १७,००० किलो SS ३१६ दर्जाचे स्टेनलेस स्टील सळ्यांचा वापर करण्यात आला आहे. तसेच चौथाऱ्यासाठी ७०० घनमीटर M ५० कोन्क्रिट वापरण्यात आले आहे. पुतळ्याचे एकूण वजन ८५ टन इतके आहे.

भारतातील जगविख्यात शिल्पकार श्री. राम सुतार यांच्या संस्थेमार्फत पुतळ्याच्या सौंदर्यशास्त्रीय व कलात्मक बाबींकडे विशेष लक्ष देउन पुतळ्याची उभारणी करण्यात आली आहे. पुतळ्याच्या संरचनात्मक बाबी आय.आय.टी., मुंबई यांच्याकडून तपासून घेण्यात आलेल्या असून ऑस्ट्रेलियास्थित विंड-टेक या संस्थेकडून विंड टनेल टेस्ट करण्यात आली आहे. आतापर्यंतच्या कोंकण किनारपट्टीवरील सर्वात वेगवान वादळाची माहिती, हवामानाची माहिती, वाऱ्याचा अभ्यास, भुकंपप्रवण क्षेत्र इत्यादी बाबीचा संगोपन विचार करून तज्ञ शिल्पकारांकडून नव्याने पुतळा उभारण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत हात घेऊन विक्रमी वेळेत पूर्ण केलेले आहे.